@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ e-pik पाहणी mudatvadh nirnay ] : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा राज्यातील खरीप हंगाम 2024 मधील शेतकरी स्तरावरील ई – पीक पाहणी करिता मुदतवाढ देणे संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून निर्गमित झाला आहे .
सदर परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्या प्रति जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रक राज्यस्तरीय नियंत्रण समिती यांच्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदरच्या पत्रकामध्ये नमूद आहे की , सन 2024-25 या खरीप हंगाम मधील ई- पीक पाहणी ( E- pik pahani ) या ॲप्समध्ये ऑनलाइन मोबाईलच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी दि .15.09.2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती . परंतु राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस यामुळे शेतकरी स्तरावरील ई – पिक पाहणीचे कामकाज पूर्ण झालेले नाहीत , असे निदर्शनास आले असून , सद्यस्थितीमध्ये सदर ईपीक पाहणी अंतर्गत शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद खूप कमी प्रमाणात झाल्याची दिसून आली आहे .
यामुळे राज्य शासनाकडून खरीप हंगाम 2024 साठी 07 दिवसांची म्हणजेच दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई – पीक पाहणी नोंद करिता मुदतवाढ देण्यात येत आहे . त्याचबरोबर तलाठी / सहाय्यक स्तरावरील ई – पीक पाहणी मुदत दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .
सदर निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ई- पीक पाहणीची खरीप हंगाम 2024 करिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंद करता येणार आहेत . सदरची नोंद करणे अत्यावश्यक आहे , याशिवाय राज्य शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई , मदत निधी दिली जात नाही , त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर नोंद करणे आवश्यक असणार आहे .

- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !