@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन मुध्याधिकारी गट अ / सहायक आयुक्त गट अ संवर्गात तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेबाबत नगर विकास विभाग मार्फत दि.19.01.2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
02.वैद्यकीय चाचणी बाबत : आखिल भारती सेवा ( कार्यमुल्यांकन अहवाल ) नियम 2007 अनुसार भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
03.मानधन : विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या 42 पदांच्या मानधनासाठी निधी वितरीत करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
04.अनुकंपा नियुक्ती पुनर्जिवित : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखा संधारित आकृतीबंधातील शिपाई व चौकीदार संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जिवित करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
05.कृषी पदुम विभाग : सरकारी कर्मचारी इ. कर्जे 201 घरबांधणी अग्रिमे , घरबांधणी अग्रिमे करीता निधी वितरीत करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भात वरील सर्व GR डाउनलोड करण्यासाठी Click Here
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !