@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ganesha utsav spardha ] : राज्य शासनामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून , प्रथम विजेत्यास तब्बल पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहेत . सदर स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राबवली जात आहे . या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे .
देशामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो , राज्यामध्ये यावर्षी उत्कृष्ट गणेशोत्सव स्थापन करणाऱ्या मंडळास पारितोषिक दिले जाणार आहेत , यामध्ये राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय अशा प्रकारचे पारितोषिक दिले जाणार असून जिल्हा निहाय जिल्हास्तरीय एका गणेशोत्सव मंडळास पारितोषिक दिले जाणार आहेत .
राज्यस्तरीय विजेत्यास पारितोषिक : राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम येणाऱ्या गणेश मंडळास पाच लाख रुपये तर द्वितीय येणाऱ्यास अडीच लाख रुपये रोख पारितोषिक त्याचबरोबर तृतीय येणाऱ्यास एक लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहेत . त्याचबरोबर जिल्हास्तरीय प्रथम येणाऱ्यास पंचवीस हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहेत .
सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता गणेश मंडळांनी प्रथम गणेश मंडळाची नोंदणी करणे आवश्यक असेल , अथवा नोंदणीकृत संस्थांना सदर स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे .
अर्ज कसा कराल : नोंदणीकृत मंडळ व संस्थांनी सदर स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता https://pldeshpandekalaacademy.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत , अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 05 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे , व अधिक माहिती सदर संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेली आहे .
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !