@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ UPS Notification issued regarding eligibility, benefits, pension determination of the scheme ] : केंद्र सरकारने लागु केलेली एकीकृत पेन्शन योजनाच्या पात्रता , लाभ व निश्चिती संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयांकडून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी अधिकृत अधिकसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .
युपीएस ( UPS ) योजनांच्या पात्रता : जो कर्मचारी सेवेचे 10 वर्षे सेवा पुर्ण करेल त्यांना लागु केली जाईल , सदर निवृत्ती ही अर्हताकारी सेवा पुर्ण करुन निवृत्त होणे आवश्यक असेल . तसेच किमान 25 वर्षे सेवा पुर्ण करणाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर , त्यांना सदर पेन्शन अंतर्गत लाभ मिळेल . तर सेवेतुन काढून टाकणे , स्वेच्छा निवृत्ती घेणे अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांन निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .
निवृत्तीवेतनाचे लाभ : सदर पेन्शन येाजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना पुर्ण पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान सेवेच्या 25 वर्षे अथवा सेवानिवृत्तीच्या वेळी निवृत्ती झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षाला मिळणाऱ्या 12 महिन्यांच्या वेतनांच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल .
तर किमान 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांकरीता किमान 10,000/- रुपये पेन्शनची तरतुद करण्यात आलेली आहे . तर कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसाला 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल .यांमध्ये महागाई भत्ताचा देखिल अवलंब करण्यात येणार आहे .
पेन्शन निश्चिती : समजा एखादा कर्मचारी 25 वर्षे सेवा पुर्ण करुन निवृत्त होत असेल व त्याला निवृत्तीवेळी 45,000/- रुपये मुळ वेतन मिळते . अशा प्रकरण त्यास पुढील प्रमाणे पेन्शन मिळेल .
45000/2 X 300/300 X 50,00,000/ 50,00,000= 22,500/- इतकी पेन्शन लागु होईल .
( यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक कॉर्पस मुल्य हे 50,00,000/- रुपये म्हणजेच 10,000 युनिट आहे . तर 25 वर्षे सेवा म्हणजे 300 महिने )
या संदर्भातील सविस्तर अधिकृत्त शासन अधिसुचना डाऊनलोड करण्यासाठी UPS पेन्शन अधिसूचना ( PDF)
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !