आज दि.26.11.2024 रोजीच्या राज्यातील काही ठळक बातम्या ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ todays breaking News ] : आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील काही प्रमुख ठळक बातम्या सदर लेखांमध्ये सविस्तर जाणून घेवूयात ..

राज्यात थंडीचे प्रमाण वाढले : राज्यांमध्ये दिवसेंदिवस थंडीचे प्रमाणे वाढत आहेत , यांमध्ये राज्यात नाशिक , पुणे , महाबळेश्वर , म्हैसमाळ या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे . तर राज्यात दरवर्षी पेक्षा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने ,  थंडीचे प्रमाणे अधिक आहे .

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनाम देणार आहेत , तर राज्यांमध्ये महायुती पक्षाकडुन सत्ता स्थापनेला वेग आला आहे . तर देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांची बैठक तुर्तास टळली आहे , तर आज रोजी एकनाथ शिंदे , अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत .

सोन्याचे भाव ( Todays Gold Rate )  : आज रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 77,716/- रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 71,240/- प्रति तोळा इतका आहे .

बेडकाची नविन प्रजातीचा शोध : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेडकाच्या नविन प्रजाती आढळून आलेली असल्याने या प्रजातीस फ्रायनोडर्मी कोकणी ( Frog From Sindhudur ) असे नामकरण करण्यात आले आहेत .

प्रधानमंत्री आवास योजनासाठी 5 हजार पेक्षा अधिक आवेदन : ठाणे येथिल 1300 घरांकरीता पीएम आवस योजना अंतर्गत 5 हजार पेक्षा अधिक आवेदन आलेले आहेत .

Leave a Comment