@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme jahirnama] : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षाकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहे , यामध्ये महायुती पक्षाकडून आपली जाहीरनामा मध्ये 10 महत्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्यात आली आहेत .
तर महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष तरतूद करण्यात आलेली आहे . सदर तरतुदीचा फायदा राज्यातील तब्बल 18 लाख शासकीय तसेच सेवानिवृत्त (Retire NPS employee) झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे .
राज्यातील दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old pension) जशाच्या तसे लागू करण्याचा जाहिरनामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर पेन्शनचा निर्णय महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेनंतर पहिल्या 100 दिवसात घेतला जाईल , अशी बाब जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे .
या जाहीरनाम्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी निश्चितच जुनी पेन्शन योजना जो पक्ष लागू करेल त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील हे निश्चित आहे . कारण राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे , यावर अद्याप पर्यंत तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे .
याशिवाय सदर विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष जुनी पेन्शन लागू करेल त्या पक्षाच्या बाजूने राज्यातील कर्मचारी उभे राहण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे , यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने vote for pension अभियान वेळोवेळी राबवली जात आहे .
