राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 03 टक्के डी.ए लांबणीवर ; डी.ए साठी निधी वितरणांमध्ये तरतुद नाही !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee vadhiv mahagai Bhatta shasan nirnay update ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 03 टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेला आहे . कारण निधी वितरणांमध्ये डी.ए साठी तरतुद करण्यात आलेली नाही .

महीना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते , यांमध्ये राज्य कर्मचारी / तसेच पेन्शन धारकांना वाढीव डी.ए करीता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले नाहीत . यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्तासाठी वाट पाहावी लागणार आहे .

महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने , निधी शिल्लक न राहील्याने , राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्तासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे .

वाढीव डी.ए चा निर्णय आता पुढील महिन्या पर्यंत लांबणीवर : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के म्हणजे एकुण 53 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्याचा निर्णय निधी अभावी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर गेला आहे .

07 महिन्यांची थकबाकीसह वाढीव डी.ए चा लाभ मिळणार : माहे फेब्रुवारी महिन्यात वाढीव 03 टक्के डी.ए सह माहे जुलै 2024 पासुनच्या 07 महिने थकबाकीसह महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

Leave a Comment