@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee strike date 29 August ] : राज्यातील शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकरिता दिनांक 29 ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत संप आयोजित करण्यात आलेला आहे .
राज्य शासन सेवेतील सरकारी अधिकारी / कर्मचारी , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या राज्य शासनाकडून मान्य होत नसल्याने , सदर कर्मचाऱ्यांकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर बेमुदत संप आयोजित करण्यात आला असून , सदर कालावधीमध्ये कर्मचारी काम बंद ठेवणार असल्याने , प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे .
सदरचे आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला असून , सदर संपाची मुख्य मागणी म्हणजे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना दिनांक 01 मार्च 2024 पासून लागू करणे संदर्भात अधिसूचना / शासन निर्णय लागू करण्यात यावे , ही प्रमुख मागणी आहे . याशिवाय राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून साठ वर्षे करण्यात यावे , जसे की केंद्र व इतर 25 राज्यामध्ये निवृत्तीचे वय 60 वर्षे आहे .
शिपाई पदावरून त्यांच्या शैक्षणिक अहतेनुसार गट ड संवर्गातील पदावर पदोन्नती देण्यात यावी . त्याचबरोबर राज्य शासन सेवेमध्ये दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात यावे .
सेवानिवृत्ती उपदान रकमेत केंद्र सरकार प्रमाणे रुपये 25 लाख इतके करण्यात यावे , संवर्ग गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सरसकट वारसा हक्काने नियुक्ती दिली जावी . सद्यस्थितीमध्ये वाहन चालक व चतुर्थ श्रेणी पदावरील पदभरती बंदी उठवण्यात यावी .
अशा प्रमुख मागणी करिता समन्वय समितीच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर बेमुदत संप आयोजित करण्यात आले , असल्याची माहिती समन्वय समितीचे सरचिटणीस निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली आहे . तरी सदर संपामध्ये राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा , अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.