राज्य कर्मचाऱ्यांना कर्जे / अग्रिमे करीता निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.07.02.2025

Spread the love

@marthiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee loan / agrim nidhi vitaran shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांना कर्जे / अग्रिमे करीता निधीचे वितरण करणेबाबत विधी व न्याय विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचारी इ.कर्जे , मोटार वाहन खरेदीसाठी अग्रीम , मोटार वाहन खरेदी अग्रिमे , याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता मंजूर अनुदानातुनन सदर निर्णयात नमुद अधिकारी / कर्मचारी यांना मोटारकार खरेदी करण्यासाठी निर्णयात नमुद नियंत्रक / मंजुरी अधिकारी यांना विवरणपत्र मध्ये दर्शविल्याप्रमाणे 80,00,000/- ( अक्षरी ऐंशी लाख रुपये फक्त ) इतका निधी मंजूर करण्यात आलेली आहे .

सदर निधीचे वितरण करताना दिनांक 17.10.2023 मधील सुचना व विहीत नियम / अटींच्या अधिन राहून तसेच सदर शासन निर्णयातील तरतदीचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात आलेली आहे . तसेच अर्जदार खरेदी करणार असलेल्या मोटार वाहनांची किंमत प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास , शिल्लक रक्कम तात्काळ शासनास परत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

मोटार वाहन अग्रिम अधिकाऱ्यांस त्यांच्या सेवा काळात एकदाच देय असणार आहे , तसेच राष्ट्रीयकृत / खाजगी अथवा सहकारी बँकाकडून तसेच वित्तीय संस्थाकडून वाहन कर्ज घेवून वाहन खरेदी केलेल्या प्रकरणी वाहन कर्जाच्या परतफेडीकरीता वाहन अग्रिम अनुज्ञेय राहणार नाही .

तसेच नविन मोटार कार खरेदी करण्याकरीता मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसूली करताना प्रथमत : मुद्दलाची अधिकतम 100 समान मासिक हप्त्यात वसूली करण्यात यावी व व्याजाची वसूली अधिकतम 40 समान मासिक हप्त्यात करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . मात्र एखादा अधिकारी नियत वयोमानानुसार मासिक हप्त्याचे 140 महिने पुर्ण होण्यापुर्वीच सेवानिवृत्त होणार असले , तर त्याच्या सेवानिवृत्तीपुर्वी संपुर्ण अग्रिमाची व्याजासह वसूली होईल अशा पद्धतीने वसूलीचे हप्ते निश्चित करण्याचे निर्देश  देण्यात आलेले आहेत .

तसेच मोटार कार अग्रिमाबाबत त्यांच्या मुळ सेवापुस्तकात नोंद घेण्याचे व घेण्यात आलेल्या नोंदीची मुळ सेवापुस्तकात छायांकित प्रत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment