@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : इयत्ता बारावीचा निकाल नुकताच लागला असून , इयत्ता दहावीचा निकाल येत्या सोमवारी दिनांक 27 मे 2024 रोजी निर्गमित होणार असल्याची बातमी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली आहे . यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची ओढ अधिकच लागली आहे .
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल दिनांक 27 मे रोजी जाहीर होणार असल्याची बातमी प्रसार माध्यमांना दिली होती , याबाबत बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता बोर्डाचा निकाल दिनांक 27 मे 2024 रोजीच प्रसिद्ध होणार असल्याची बातमी समोर येत आहे .
निकाल येत्या सोमवारी जाहीर करण्याकरिता बोर्डाकडून युद्धपातळीवर कामकाज सुरू आहे , विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंग साठी देण्यात येणाऱ्या चित्रकला , क्रीडा, त्याचबरोबर लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे . यंदाच्या वर्षी राज्यातील तब्बल 15 लाख विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दिली आहे . दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे .
या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याने , दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दहावीचा निकाल लवकर प्रसिद्ध केला जाणार आहे . त्याचबरोबर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा दीड महिन्यामध्ये घेण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे .
दोन विषयात अनुत्तीर्ण झाले तरी मिळणार अकरावीमध्ये प्रवेश : दहावी मध्ये कोणत्याही दोन विषयात अनुत्तीर्ण झाले असल्यास , अकरावीच्या कला शाखेमध्ये प्रवेश घेता येते . तर अनुत्तीर्ण विषय जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेत अथवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत सदर विद्यार्थ्यास पास व्हावेच लागेल , अथवा सदर विद्यार्थ्यास इयत्ता बारावी मध्ये प्रवेश घेता येत नाही .
निकाल कसा पाहावा : mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…