@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आजच्या युगांमध्ये अत्यावश्यक गरजांमध्ये मोबाईल ही एक बाब अत्यावश्यक ठरत आहे . परंतु मोबाईल पासुन लोकांना अनेक प्रकारचे मानसिक व शारीरिक आजारांचा सामना करावा लागत आहे . लोकांना मोबाईलच्या अतिवापरांमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होत आहेत .
शिवाय आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरण्याचे प्रमाण अधिक वाढत आहेत . जसे मोबाईलचे अनेक फायदे आहेत , त्या तुलनेत मोबाईलचे अनेक तोटे आहेत . जसे कि , आजकाल मोबाईल पासुन अत्यावश्यक माहितींचे आकलन घेण्यापेक्षा मनोरंजनासाठी अधिक वापर करीत आहेत , जसे कि मोबाईलचा वापर चॅटिंग करणे , व्हिडिओ पाहणे , सेल्फी घेवून सोशल मिडीया वर अपलोड करणे असे अनेक प्रकारचे मनोरंजनाकरीता वापर केला जात आहेत .
मोबाईलच्या माध्यमातुन आपणांस अनेक प्रकारच्या माहिती एका क्लिकवर मिळते , आपण जर गुगल वर एखादी माहिती सर्च केल्यास , हजारो माहितींचा भांडार आपल्यासाठी खुला होतो . परंतु आजकालची तरुण पिढी मोबाईलचा सदोपयोग करण्यापेक्षा वाईट गोष्टींसाठी अधिक वापर करतात . तज्ञांचे मते एका दिवसांमध्ये 3 तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर होत असल्यास , आपणांस अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते .
सेलफोनमधून उत्सर्जित होणारी किरणांपासून कर्करोगांसारखे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरत आहेत . तसेच ह्रदय विकार सारखे क्रोनिक रोगांसाठी देखील कारणीभूत असतात . तसेच मोबाईलच्या अतिवापरांमुळे डोळ्यांचे विकार होत असतात , त्याचबरोबर मानसिक आरोग्य बिघडते , तसेच श्रेवणदोष निर्माण होत आहेत . म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळावा .
मोबाईलचा अतिवापर कसा टाळावा : आपण ज्या प्रमाणे आठवड्यातुन एकदा उपवास करीत असतो , त्याप्रमाणे एक दिवस मोबाईलला वापरण्याचा उपवास करावा , तसेच अत्यावश्यक कामासाठीच मोबाईलचा वापर करावा , मनोरंजानासाठी मोबाईल पेक्षा मोठे स्क्रिन असणारे टि.व्ही , लॅपटॉपचा वापर करावा .
लहान मुलांना मोबाईल देण्यापेक्षा खेळणीचे साहित्य द्यावेत , जेणेकरुन लहान मुलांची योग्य प्रकारे शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होईल . अन्यथा मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या योग्य प्रकारे मानसिक वाढ होत नाही .
-
अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Relief fund for those affected by crop damage due to unseasonal rains ] : नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 19 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय…
-
वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the current revised rates for breaking traffic rules ] : वाहतुकीचे नियम मोडलयास सुधारित दंडाची रक्कम सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून , यांमध्ये तब्बल 1000 पटीने रक्कम वाढविण्यात आलेली आहे . दारु पिऊन गाडी चालविणे : दारु पिऊन गाडी चालविल्यास जुन्या दरानुसार 1000-1500/- रुपये दंड आकारला…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued today, 19.03.2025, regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय…