@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Shri Tulasi Tanti Scholarship Program 2024-25 ] : तुलशी तंती शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 अंतर्गत इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत मुलींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी , प्रतिवर्षी 6,000/- रुपये दिले जाणार आहेत . याकरीता ऑनलाईन माध्यमातुन दि.10.12.2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत .
आवश्यक पात्रता : सदर शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेण्यासाठी सध्या मुलगी ही इयत्ता 9 वी / अभियांत्रिकी डिप्लोमा / बी.ई / बी.टेक अभ्यासक्रमांस प्रवेशित असणे आवश्यक असेल . तर त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपये पेक्षा कमी असावेत . तर सदर मुलगी ही महाराष्ट्र तामिळनाडू , आंध्र पदेश , मध्य प्रदेश , गुजरात , दमण , पदुच्चेरी येथील रहीवाशी असणे आवश्यक असेल .
शिष्यवृत्ती आर्थिक लाभ :
अ.क्र | अभ्यासक्रम | शिष्यवृत्ती रक्कम |
01. | 9 वी | 6,000/-रुपये |
02. | अभियांत्रिकी डिप्लोमा | 60,000/- |
03. | अभियांत्रिकी पदवी | 120,000/- |
अर्जाची प्रक्रिया : पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी buddy4study.com या संकेतस्थळावर जावून Shri Tulsi Tanti Scholarship Program 2024-25 हे प्रोग्राम सलेक्ट करावेत . व दिनांक 10.12.2024 पर्यंत सदर शिष्यवृत्ती आवेदन सादर करण्याची अंतिम मुदत असणार आहे .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025