@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rules to be followed by government employees while living their personal lives ] : महाराष्ट्र नागरी सेवा नियम नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांने आपले वैयक्तिक आयुष्य जगत असताना , काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहेत , सदर नियमांचे उल्लंघन केल्यास सदर कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही होवू शकते .
मादक पदार्थ : महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार , शासकीय अधिकारी / कर्मचारी हा शासकीय काम करत असताना , कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थ्यांचे सेवण करु नये असे नमुद आहे . याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांने शासकीय कामाव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी मादक पदार्थांचे सेवण करुन नयेत ,तसेच प्रमाणापेक्षा अधिक सेवण करु नयेत .
लैंगिक छळ : राज्य सरकारी कर्मचारी हा कोणत्याही महिलेसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे लैंगिक प्रकारचे छळवाद करणार नाही , अन्यथा सदर कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही होवू शकेल .
वैवाहिक बाबी संदर्भात : राज्य कर्मचारी हा 02 लग्न करु शकत नाही , किंवा अगोदरच लग्न झालेल्या व्यक्तीसोबत लग्न करुन शकत नाही . जर लग्नासाठी दुसऱ्या देशातील व्यक्ती असल्यास या संदर्भात पुर्वी शासनांस कळविणे आवश्यक असेल . तसेच लग्नांमध्ये हुंडा घेणार / देणार नाही , याकरीता हुंडा प्रतिबंधक कादया 1961 चे पालन करणे आवश्यक असेल .
बक्षीस : सरकारी कर्मचाऱ्यांने कोणत्याही प्रकारचे बक्षीसे स्वकारु नयेत , ज्यामुळे शासकीय कामांमध्ये व्यत्यय येवू शकतो . किंवा आपल्या पदाचा गैरवापर होवू शकतो . यामुळे कोणत्याही व्यक्तींकडून बक्षीसे / देणग्या स्विकारु नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025