@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Press note issued by the administration regarding precautions to be taken while eating bhagar during fasting ] : महाशिवरात्री निमित्त देशांमध्ये उपवासाचे पदार्थ यांमध्ये भगर मोठ्या प्रमाणत खाल्ले जाते . याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत महत्वपुर्ण प्रेस नोट दिनांक 25.02.2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे .
सदर प्रेस नोट नुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होत असतो , ज्यामुळे फ्युमिगाक्वेलिन या सारख्या विषद्रव्ये तयार होत असतात . माह ऑक्टोंबर महिन्यातील तापमान व आर्द्रता बूरशीच्या वाढीकरीता अनुकुल ठरत असतात . अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यास आल्यास , अन्न विषबाधा होवू शकते .
म्हणून भगर खाताना बाजारातुन भगर आणल्याच्या नंतर ती निवडून स्वच्छ करावेत , शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्यावेत , बँड नाव नसलेली अथवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सुटी भगर घेवू नयेत . भगर घेताना पाकीटावरचा पँकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावेत .
तसेच भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी , व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवावेत , जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही .तसेच जास्त दिवस भगर साठवू नयेत , जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ देखिल नयेत .
तसेच शक्यतोवर भगीचे पीठ विकत आणू नयेत , भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते , त्यामुळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता अधिक असते . भगरीच्या दशम्या अथवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी .
तसेच भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळन घ्यावेत , जास्त दिवस पीठ साठवू नयेत , तसेच बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळावे .या संदर्भातील सविस्तर प्रेस नोट पुढीलप्रमाणे जाणून घ्या..

- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !