8 वा वेतन आयोग 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मिळण्याची शक्यता ; यानुसार पगारातील वाढ व सुधारित वेतन मॅट्रिक्स , जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Possibility of getting 2.86 times fitment factor as per 8th Pay Commission ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन आठवा वेतन आयोग लागु होणार आहे , सदर वेतन आयोग हा 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मिळण्याची शक्यता आहे . या नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये किती वाढ होईल , सुधारित वेतन मॅट्रिक्स कश्या असतील , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

आठवा वेतन आयोगातील प्रमुख बाबी : आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी ही दिनांक 01.01.2026 पासुन होणार आहते , तर वेतनातील वाढ ही 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे अपेक्षित आहे . या वेतन आयोगाचा लाभ हा केंद्र सरकारच्या 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे . यांमध्ये एकुण वेतनातील वाढ ही 20 ते 35 टक्के इतकी असणार आहे .

आठवा वेतन आयोगातील वेतन सुधारणा ही 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे देण्याची मागणी कर्मचारी युनियन कडून करण्यात आलेली आहे , तसे निवेदन देखिल सरकारकडे सादर करण्यात आलेले आहेत . या 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सातवा वेतन आयोगातील मूळ वेतन व आठवा वेतन आयोगात होणार मूळ वेतनातील वाढ या संदर्भातील सविस्तर तक्ता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात.

पे लेव्हलसातवा वेतन आयोगातील मुळ वेतनआठवा वेतन आयोगात सुधारित मूळ वेतन ( 2.86 पट फिटमेंट फॅक्टर नुसार )
पे-लेव्हल -0118,00051480
पे-लेव्हल-021990056914
पे-लेव्हल-032170062062
पे-लेव्हल-042550072930
पे-लेव्हल-052920083512
पे-लेव्हल-0635400101244
पे-लेव्हल-0744900128414
पे-लेव्हल-0847600136136
पे-लेव्हल-0953100151866
पे-लेव्हल-1056100160446

आठवा वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता हा मुळ वेतनाच समायोजन केले जावू शकते , म्हणजेच महागाई भत्ताचे दर हे स्वयंचलित पद्धतीने मुळ वेतनात वाढ होत राहील .

Leave a Comment