@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Police Department Recruitment From Outsourcing ] : राज्य शासनांच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या मिरा – भाईंदर – वसई – विरार पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 500 मनुष्यबळाच्या सेवा ह्या बाह्य यंत्रणेकडून घेण्यास गृह विभागाच्या दिनांक 06 जुन 2024 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होई पर्यंत 11 महिन्यांच्या कालावधीकरीता 500 मनुष्यबळाच्या सेवा MSF मंडळाकडून घेण्याकरीता मान्यता देण्याची बाब राज्य शासनांच्या विराधीन होती .
पोलिस अधिक्षक , ठाणे ग्रामीण व पालघर घटकाचे विभाजन केल्याने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मिरा – भाईंदर वसई – विरार पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत 500 मनुष्यबळाच्या सेवा ह्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून ( MSF ) घेण्याकरीता दिनांक 01 एप्रिल 2024 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2025 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्यास सदरच्या निर्णयानुसार मान्यता प्रदान करण्यात येत आहेत .
सदरची मान्यता ही वित्त विभागाच्या उपसमितीच्या दिनांक 27 मे 2024 रोजीच्या शिफारसीस अनुसरुन देण्यात आलेली आहे . सदरच्या बाबीकरीता येणारा खर्च हा बी-1 , 2055 पोलिस या मुख्य लेखा शिर्षांतर्गत 109 ( 00) (01) 2055 0168 जिल्हा पोलिस बल या उपलेखा शिर्षाखाली 10 – कंत्राटी सेवा या लेखाशिर्षातुन चालु आर्थिक वर्षाच्या मंजूर अनुदानातुन खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

-
शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular and form to provide information to teachers for registration for senior and selected category in-service training ] : वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मा.आयुक्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य नाशिक…
-
भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Despite huge opposition from BJP, 4% reservation for Muslims finally ] : भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे . कर्नाटक विधानसभेत या संदर्भात निर्णय घेतला असून , या राज्यात आता मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण लागु करण्यात…
-
दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weather forecast till March 25: Unseasonal rains will fall in these parts of the state ] : दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या काळातील सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . राज्यांमध्ये सध्या वातावरणात अचानक बदल होताना दिसून…