शेतकऱ्यांसाठी गुड न्युज : सन 2024-25 या वर्षाकरीता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरीता निधी वितरण GR निर्गमित दि.05.06.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project ] : सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रुपये 1 कोटी निधी वितरीत करणेबाबत  राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 05 जुन 2024 रोजी GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे .

विदर्भ / मराठवाड्यातील तब्बल 4210 गावे त्याचबरोबर विदर्भातील पुर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्यातील 932 गावे अशा एकुण 5,142 गावांमध्ये 06 वर्ष्ज्ञे कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे 4000/- कोटी रुपये ( अंदाजित खर्चाचा ) नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे .यांमध्ये दि.14.02.2022 रोजीच्या निर्णयानुसार नाशिक जिल्हामधील मालेगाव तालुकामधील सर्व गावांचा समावेश करण्यात आलेला आहे .

सदरच्या कृषी व पदुम विभागांकडून निर्गमित निर्णयानुसार सन 2024-25 करीता संचालक , नानाजी देशमुख , कृषी संजीवनी प्रकल्प , मुंबई यांना रुपये 1 कोटी ( अक्षरी रुपये एक कोटी फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

सदरचा निधी हा प्रकल्पाच्या राज्य हिश्याच्या 01-राज्य वेतन या उपलेखाशीर्षाखाली वितरीत करण्यात येत असून , सदरचा निधी हा प्रकल्पाच्या राज्य हिश्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन 2024-25 मध्ये अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतुदीतुन पीक संवर्धन , लहान / सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना , हवामान अनुकुल कृषी प्रकल्प , 01 – वेतन या लेखाशीर्षांखाली खर्ची टाकरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

याबाबतचा निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment