@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Minutes released regarding various issues related to employee transfers and directions of the meeting; Dated 28.03.2025 ] : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे बदली संदर्भातील विविध प्रश्नावर दिनांक 17 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक 28 मार्च 2025 रोजी ग्रामविकास विभागांकडून जाहीर करण्यात आले आहेत .बैठकीतील विविध प्रश्न व प्रश्नावर बैठकीत झालेले निर्देश पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
01.बदली 30 जुन तारखेनुसार राबविणे बाबत : जिल्हांतर्गत बदलीकरीता 31 मे ऐवजी 30 जुन या तारखेपर्यंत राबविल्यास शासन निर्णयातील तरतुदीस व बदली अधिनियमातील तरतुदीस बाधा पोहोचेल त्यामुळे सदरच्या बदल्या ह्या दिनांक 30 जुन या तारखेनुसार राबविण्याची बाब तपासुन घेण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
02.पदोन्नती प्रक्रियानंतर बदली : पदोन्नती प्रक्रिया नंतर बदली करणेबाबत , प्रश्नावर निर्देश देताना स्पष्ट करण्यात आले कि , विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नती नंतर बदलीची कार्यवाही करणेबाबत ,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
03.सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बदली प्रक्रिया मधून वगळणे बाबत : पुढील वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग 01 मधून बदलीपात्र ठरविण्यास यावेत , जर तशी विनंती न केल्यास त्यांना वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मधील महत्वपुर्ण तरतुदी ; कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे !
04.पती – पत्नी एकत्रिकरण : पती – पत्नी एकत्रिकरण बदल्या बिंदुनामावलीचा विचार न करता करणे हे शासन नियमास धरुन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .
05.आपसी बदली : जि.परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ही ऑनलाईन पोर्टलवर होत असल्याने सद्य : स्थितीत आपसी बदली न होता साखळी पद्धतीने आंतरजिल्हा बदली करण्यात येते , तसेच जिल्हा अंतर्गत बदलीकरीता शिक्षकां मार्फत देण्यात येणाऱ्या शाळांचा प्राधान्यक्रम तरतुदीनुसार ऑनलाईन पोर्टलवर बदल्या होतात .
- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !