Live marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state rain Update next 24 hours ] : राज्यामध्ये पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याची शक्यता , भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात अलेली आहे . सदर पुढील 24 ( next 24 hours) तासात काही भागांमध्ये मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील मुंबई जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासांत मेघगर्जनासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . त्याचबरोबर राज्यातील कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये विजेच्या कडाक्यासह वादळी – मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आली आहे .तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजेच्या कडाक्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे .
तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी – वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे , त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे . मराठवाड्यामध्ये सदरचा पाऊस सोयाबीन पिकासाठी लाभदायक ठरणार आहे , कारण सोयाबीन सध्या फळांमध्ये असल्याने सोयाबीनची दाणे वाढीसाठी सदरचा पाऊस अधिक पोषक ठरणार आहे .
यंदाच्या वर्षी मराठवाडा विदर्भ व कोकण या विभागामध्ये चांगला पाऊस पडला असून , पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण इतर विभागाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे , परंतु पश्चिम पूर्ववाहिन्या नद्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील धरणे 100% क्षमतेने भरली आहेत .
पुढील 24 तासांमध्ये कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !