राज्य राखीव पोलिस दलांमध्ये 4800 जागांसाठी महाभरती ; असा करावा लागेल आवेदन !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलांमध्ये जवान पदांच्या तब्बल 4800 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक व शारिरीक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( State Reserve Police Force Recruitmetn For Javan Post , Number of Post Vacancy – 4500 )

सध्या देशांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील महिन्यांमध्ये नियोजित असल्याने , आचार संहिता पुर्वीच महाराष्ट्र पोलिस भरती मध्ये राज्य राखीव पोलिस दलांमध्ये रिक्त पदांच्या तब्बल 4500 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सदर पदांवर दिनांक 05 मार्च 2024 पासुन आवेदन सादर करता येणार आहेत . तर आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक 31.03.2024 अशी असणार आहे .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सउदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी ( उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर उमेदवार हे MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 168 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .

वयोमर्यादा : सदर सशस्त्र पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवाराचे खुला प्रवर्ग करीता किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

Leave a Comment