राज्यातील “या” आठ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update news ] : राज्यामध्ये सध्या पाऊस कमी झाला आहे , परंतु भारतीय हवामान खात्याने दिलेली अंदाजानुसार राज्यामध्ये खाली नमूद आठ जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , सविस्तर अंदाज पुढील प्रमाणे पाहूयात .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने , देशात काही भागात थंडीचे प्रमाण कमी होऊन , पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामध्ये महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त करण्यात आलेला आहे .

सदर कमी दाबाचा पट्ट्यामुळे दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2024 म्हणजेच गुरुवार व शुक्रवारी राज्यात धाराशिव , सोलापूर , सांगली , सातारा , रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,पुणे ,कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह , हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे .

यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण काहीसे कमी होऊन वातावरणात बदल होणार आहे . म्हणजेच थंडीचे प्रमाण कमी होऊन , तापमानात काहीसा वाढ होणार आहे . यामुळे वातावरणात अचानक बदल दिसून येणार आहे .

तर सदर पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी रबी हंगामाची पेरणी केली आहे , अशा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे . सदर पावसानंतर राज्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता खूप कमी आहे .

Leave a Comment