लाडकी बहीण योजनांसाठी फक्त या तिन कागदपत्रांची आवश्यकता ; जाणून घ्या सुधारित पर्यायी कागदपत्रे !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana document ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत आवेदन सादर करण्यासाठी सध्या महिलांची चांगलीच धावपळ सुरु झालेली आहे , परंतु कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यक असणार नाहीये , कागदपत्रांसाठी राज्य शासनांकडून पर्यायी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

सदर योजना अंतर्गत आवेदन सादर करण्यासाठी फक्त 3 कागपत्रांची आवश्यक असणार आहे, तर उर्वरित 02 कागदपत्रे आवश्यकता नुसार / ऐच्छिक असणार आहेत .तर तीन कागदपत्रे हे महत्वाचे असणार आहेत . सदर तीन अनिवार्य कागदपत्रे व त्यांना पर्यायी कागदपत्रे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

  • आधार कार्ड : आधारकार्ड हे अनिवार्य असणार आहे , सदर कागदपत्रासह कोणतेही पर्यायी कागदपत्रे नसणार आहे .
  • अधिवास / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा अपलोड करणे अनिवार्य असणार आहे .
  • उपन्न प्रमाणपत्र / पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड : या कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहेत .

अर्जदाराचे हमीपत्र : नारीशक्ती दुत या ॲप्सवर तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोर्टलवर अर्जदाराचे हमीपत्र नमुद करण्यात आले आहेत , सदर हमीपत्र सदर आवेदनांसोबत जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत .

ऐच्छिक / आवश्यकता नुसार अपलोड करायचे कागदपत्रे : याशिवाय बँक पासबुक अपलोड करणे ऐच्छिक असणार आहे , तर ज्या महिलांचा जन्म हा दुसऱ्या राज्यांमध्ये झाला असेल , अशांनी पतीचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असणार आहेत .

Leave a Comment