@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision of the SP Department regarding Class – 4 employees ] : वर्ग – 4 कर्मचारी संदर्भात गणवेशाच्या शिलाई भत्ता दरात व धुलाई भत्ता दरांमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10.10.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या विविध बाबींमध्ये म्हणजेच शिलाई दरात सुधारणा करणे तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाऊजचे शिलाई दर वाढविणे , गणवेश धुलाई भत्ता दरात सुधारणा करणे तसेच गरम कपड्यांच्या गणवेश शिलाई दरात वाढ करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
तर दिनांक 10.10.2024 रोजीच्या निर्णयानुसार , शिलाई दरात सुधारणा तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाऊजचे शिलाई दर वाढविणे , व गणवेश धुलाई भत्ता दरात सुधारणा याशिवाय गरम कपड्यांच्या गणवेशाच्या शिलाई दरात वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे .
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी संवर्गातील गणवेशपात्र कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाई व धुलाई भत्ता अनुज्ञेय करताना या कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेत नियमितरित्या गणवेश परिधान करण्यात येत असल्यची तपासणी करण्याची / लक्ष ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय / नियंत्रण अधिकारी यांची असेल असे नमुद करण्यात आले आहेत .
तर बाह्य यंत्रणेने भरण्यात येणाऱ्या चतुर्थश्रेणी पदांना प्रस्तावित गणवेश शिलाईभत्ता , धुलाई भत्ता अनुज्ञेय असणार नाही , तर याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची राहील असे नमुद करण्यात आले आहेत . सुधारित दर संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहु शकता ..

- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !