अर्जित रजा रोखीकरण संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular regarding cashing of earned leave ] : अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय मार्फत दिनांक 30.05.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार , खाजगी शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणोच प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या प्रकरणी निकाली काढण्याकरीता संचालनालय स्तरावरुन मार्गदर्शन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) व अधिक्षक वेतन व भ.नि.नि पथक ( प्राथमिक ) बुलडाणा यांना विनंती करण्यात आलेली होती .

यानुसार प्राथमिक संचालनालय कार्यालयांकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून , यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , खाजगी शाळेतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 नियम 16 मधील 18 (ब) नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक वर्ष करीता 15 दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे .

तर खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय राहणार नाही असे नमुद करण्यात आलेले आहेत . याशिवाय नियम 19 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुटीचा अथवा तिच्या भागाचा लाभ घेण्याकरीता प्रतिबंध करण्याकरीता मुख्याध्यापक / कर्मचाऱ्यांला शिक्षण अधिकारी यांची पुर्वपरवानगी मिळविणे आवश्यक असेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तर दिनांक 01.07.1995 च्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक / मुख्याध्यापक यांना अर्धवेतन रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी 10 दिवस मान्य करण्यात आले आहेत . तथापि सदर आदेशांमध्ये अर्धवेतनी रजा ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा रोखीकरण करता येत नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .तर खाजगी शाळेतील कर्मचारी हे 1981 च्या नियमावली मध्ये नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक यांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय राहणार नाहीत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

Leave a Comment