बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा तडाखा ; IMD मार्फत राज्यासाठी मोठे संकेत ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ imd monsoon update news ] : हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरांमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , म्हणुनच आयएमडी मार्फत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे .

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे , यामुळे समुद्र किनारी भागांसाठी भारतीय हवामान खात्यांकडून अलर्ड जारी करण्यात आलेला आहे . बंगालच्या उपसागरांमध्ये तयार होणारे चक्रीवादळाचा परिणाम सर्वाधिक केरळ राज्याच्या किनारी भागात होणार असल्याचा अंदाज आहे .

सदर चक्रीवादळ पुढील 48 तासांपर्यंत सक्रिय असणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत . तर चक्रीवादळांमध्ये बऱ्याच किनारी भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे . सध्या स्थितीमध्ये सदर चक्रीवादळांमध्ये मुसळधार पाऊस असल्याची माहिती हवाामन खात्यांकडून देण्यात आलेली आहे .

चक्रिवादळामुळे केरळ मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट तर किनारी भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , तर महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

सदर कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडणार असून , कोकण किनार पट्टीवरील भागांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे , यांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे , या भागांमध्ये विजेच्या कडाक्यांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

Leave a Comment