Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt employee bharat sarakar , Maharashtra shasan , Maharashtra police board under low ] : आता यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांवर भारत सरकारी , महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र पोलिस अशा प्रकारच्या नावांच्या पाट्यावर कायद्याच्या रडावर आले आहेत .
राज्यांमध्ये पुण्यात घडलेल्या पुजा खेडकर यांच्या खाजगी महागड्या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून फिरत असलेले प्रकरण सध्या राज्यात चांगले गाजत असल्याने , राज्यात आता यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांकडून खाजगी वाहनांवर अश्या प्रकारच्या नावांच्या पाट्या लावून मिरवत असल्यास , त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही होणार आहे .
अशा प्रकारच्या पाट्या विशेषत : जिल्हाधिकारी कार्यालयांमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून खाजगी वाहनांवर अशा प्रकारच्या पाट्या लावून वाहने मिरवत असतात अशांवर कायदेशिर कार्यवाहीची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहेत .
मोटार वाहन कायदा काय सांगतो ? : मोटार वाहन कायदा 1988 नुसार शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या खासगी वाहनांवर शासकीय नावाची पाटी लावण्यास बंदी आहे . सदर कायद्यानुसार कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र शासन , भारत सरकार , महाराष्ट्र पोलिस अशा नावाने पाट्या लावून मिरवणे मोटर वाहन कायदा 1988 च्या नियम 177 चे उल्लंघन समजण्यात येते .
या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कार्यवाही तसेच अशा प्रकारचे कृत्य वारंवार केल्यास त्यांना गंभीर स्वरुपाचे शिक्षा देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .
आता यापुढे सदर मोटार अधिनियम कायद्याचे उल्लंघन करुन खाजगी वाहनांवर शासकीय पाट्या लावण्याचे कृत्य केल्यास ,त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही केली जाईल असे , पुण्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून सांगण्यात आले आहेत .
-
राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Administrative approval for distribution of grants to aided schools in the state GR issued on 21.03.2025 ] : राज्यातील मान्यताप्राप्त असणाऱ्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 21 मार्च 2025 रोजी…
-
अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
Spread the love@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी [ Important GR issued by Finance Department regarding subscription of Group Insurance Scheme of Officers/Employees ] : वित्त विभागाकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत , निर्णय घेण्यात आला आहे . सा.प्र.विभागच्या दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या…
-
आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Now additional revised remuneration to these government employees for overtime work; GR issued on 21.03.2025 ] : जादा कामा करीता अतिरिक्त मानधन अदा करणेबाबत सुधारित शासन निर्णय राज्य शासनांच्या नियोजन विभाग मार्फत दिनांक 21 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार…