कर्मचारी / पेन्शन धारकांचा माहे जानेवारी 2025 चा डी.ए ( महागाई भत्ता ) वाढविणे बाबत , वित्त विभागाचा प्रस्ताव !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Finance Department’s proposal regarding increase in DA (Dearness Allowance) of employees/pensioners for the month of January 2025. ] : केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे माहे जानेवारी 2025 चा डी.ए ( महागाई भत्ता ) वाढविणेबाबत , केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून , सदर प्रस्ताव मा.पंतप्रधान यांना सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे .

दरवर्षी पेक्षा या वर्षी जानेवारी महिन्यांच्या डी.ए वाढीचा निर्णयास विलंब झाला आहे . दिनांक 19 मार्च 2025 रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत देखिल याबाबत निर्णय झाला नाही , तर आज रोजी कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित आहे , सदर बैठकीत वित्त मंत्रालयाकडून डी.ए वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त मिडीया रिपोर्ट नुसार समोर येत आहेत  .

3 टक्के डी.ए वाढीची अपेक्षा : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासुन 53 टक्के दराने डी.ए लागु आहे , यामध्ये आता पुन्हा एकदा 3 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे . यामुळे एकुण डी.ए हा 56 टक्के इतका होणार आहे .

सदर डी.ए वाढीची आकडेवारी ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार अपेक्षित डी.ए वाढ 3 टक्के इतकी आहे . यामुळे केंद्रीय कर्मचारी / तसेच पेन्शन धारकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

वित्त विभागाचा प्रस्ताव : केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करणेबाबत , प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला असून , कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर सदर डी.ए वाढीची अधिकृत्त घोषणा होईल .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment