फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील “या” जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता ; जाणून घ्या पंजाबराव यांचा पावसाचा अंदाज !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ fengal cyclone rain Update news] : फेंगल “या” चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज , हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे . सदर अंदाजानुसार दिनांक 06 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

राज्यामध्ये फेंगल “या” चक्रीवादळामुळे अचानक थंडी कमी झाली आहे , तर पावसाचे वातावरण दिसून येत आहे . यामध्ये पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यांमध्ये दिनांक 06 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

दिनांक 03 डिसेंबर रोजीचा अंदाज : दिनांक 03 डिसेंबर रोजी राज्यातील धाराशिव , सोलापूर , सांगली, कोल्हापूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

याशिवाय दिनांक 06 डिसेंबर पर्यंत मराठवाड्यातील वाशिम , परभणी , नांदेड , हिंगोली , लातूर , धाराशिव , बीड या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . याशिवाय विदर्भामध्ये नागपूर , यवतमाळ , बुलढाणा तर पश्चिम महाराष्ट्र मध्ये नगर , सोलापूर , सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

याशिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव , नाशिक या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर दिनांक 08 डिसेंबर नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ वातावरण तयार होणार आहे .

Leave a Comment