राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर , दि. 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण कर्जमुक्त करण्याचा मनोज जरांगे यांचा अल्टिमेटम ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra all farmer loan free news] : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयामध्ये बदल करून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही , तर संपूर्ण कर्जमुक्त करण्याचा अल्टीमेटम मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे .

मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळले असून , शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याचा अल्टिमेटम हाती घेतला आहे , आपले आंदोलनामध्ये एका वेगळ्याच शैलीतून बोलणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याकरिता दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत राज्य शासनाला अल्टिमेटम देण्यात आला आहे .

तर दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती कशी होत नाही तेच पाहतो , असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्य शासनास दिला आहे . याशिवाय शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा , तसेच  पीक विमा अनुदान संपूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

मनोज जरांगे पाटील सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत , याकरिता मनोज जणांनी पाटील यांच्याकडून सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे .आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने निवडणूक लढविण्याकरिता सुमारे 800 अर्ज प्राप्त झाले आहेत , सदर अर्जांची चाचपणी खुद्द मनोज जरांगे पाटील हे करीत असल्याचे माहिती समोर येत आहे.

सदर निवडणुकीमध्ये जरांगे पाटील मराठा आरक्षण याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न या अनुषंगाने निवडणूक लढवणार आहेत . निवडणुकीमध्ये मराठा समाजा व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या प्रश्न पुढे ठेवून निवडणुकीत भाग घेतल्यास शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल . याकरिता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कायमची वीज देण्यात यावी , तसेच पाण्याच्या मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे . शेतमाला योग्य भाव देण्यात यावा , जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास सहाय्य होईल असा , दावा मराठा समाजाचे आंदोलन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे .

Leave a Comment