@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Eighth Pay Commission and Maharashtra State Government Employees; Know some important things. ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडून अधिकृत गाईडलाईन देण्यात आलेली आहे . त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन 2026 च्या सुरुवातीपासुन आठवा वेतन आयोग लागु होईल .
याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणेच उशिरा आठवा वेतन आयोग लागू होईल . जसे कि मागील सर्व वेतन आयोग हे केंद्र सरकारचे वेतन आयोग लागु झाल्यानंतर 02 वर्षानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागु झाले आहेत .
राज्य कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग कधी लागु होणार : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नविन / आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन प्रत्यक्ष लागु करण्यात येईल , तर त्यानंतर सदर केंद्रीय आठवा वेतन आयोगाचा अभ्यास करुन राजय कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2029 पर्यंत नविन वेतन आयोग दिनांक 01.01.2026 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येईल .
किमान मुळ वेतन : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतन व राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये ( फिटमेंट फॅक्टर नुसार ) किदान 5,000/- इतका फरक असेल . जसे कि सातवा वेतन आयोगांमध्ये किमान मुळ वेतनात 3,000/- रुपये इतका फरक होता .
महागाई भत्ता : नविन वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ताचे दर हे पुन्हा एकदा शुन्य टक्के होईल , तर इतर देय भत्तांमध्ये वाढ होईल , जसे कि वाहन भत्ता , घरभाडे भत्ता , प्रोत्साहन भत्ता ..
- आज दिनांक 29 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !
- जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , अखेर GR निर्गमित दि.28.04.2025
- अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणापत्र देणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- पहलगाम आतंकवादी हल्यानंतर भारताचे 5 मोठे कठोर निर्णय ; पाकिस्तानने देखिल घेतले भारतावर पलटवारीचे निर्णय !