जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत 07 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी काढण्याची सोपी पद्धत ; एकुण फरकाची रक्कम किती मिळेल !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Easy method to withdraw 07 months of dearness allowance arrears from July 2024 to January 2025 ] : राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 25.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतन 2025 च्या वेतन देयकासोबत डी.ए थकबाकीसह 53 टक्के दराने वाढीव डी.ए देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

दि.01.07.2024 पासुन डी.ए 50 टक्के वरुन 53 टक्के इतका झाला आहे , म्हणजेच डी.ए मध्ये 03 टक्क्याची वाढ झालेली आहे . तर माहे जुलै 2024 ते जानेवारी 2025 या सात महिन्यांची थकबाकी किती मिळेल , सदर थकबाकीची रक्कम काढण्याची सोपी पद्धत पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

डी.ए थकबाकी काढण्याची सोपी पद्धत : मुळ वेतन X 3/100 = एका महिन्याची थकबाकी , तर एका महिन्यांची थकबाकी X 7 = एकुण डी.ए थकबाकी ( पुढील उदा.नुसार समजुन घेवूयात . )

उदा क्ष चे मुळ वेतन हे 26000/- रुपये आहे तर त्याची एकुण डी.ए थकबाकी काढण्याची = 26000 X 3/100 = 780 ( एका महिन्याची थकबाकी )

सात महिन्यांची डी.ए थकबाकी = 780 ( एका महिन्याची थकबाकी ) X 7 = 5460 ( सात महिन्याची डी.ए थकबाकी )

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment