@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ divali festival bonas publish ] : दिनांक 26 ऑक्टोबर पासून दिवाळी सणाची सुरुवात होणार आहे , त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने , दिवाळी सण साजरा करता यावी . याकरिता तब्बल 24,000/- रुपये इतका बोनस जाहीर करण्यात आली आहेत . याबाबत मुख्यमंत्री यांनी सदर बोनस वाढीच्या आदेशाला मंजुरी दिली आहे .
ठाणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने बोनस म्हणून 24 हजार रुपये इतकी रक्कम जाहीर केली आहे , मागील वर्षापेक्षा यावर्षी बोनस मध्ये 2500/- रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे . मागील वर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे पालिका अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 21,500/- बोनस जाहीर करण्यात आला होता .
तर यावर्षी सदर रकमेत 2500/- रुपयांची वाढ लागू करण्यात आल्याने , एकूण 24 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला आहे . बोनस वाढीस राज्य सरकारकडून मंजुरी दिली गेली आहे .
सन 2021- 22 मध्ये सदर कर्मचाऱ्यांना 18000/- रुपये बोनस मिळाला होता तर 2022-23 आणि 2024-25 या वर्षांमध्ये दिवाळी बोनस म्हणून 21,500/- रुपये देण्यात आले होते , यामध्ये यंदाच्या वर्षी मोठी वाढ करण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे .
तर ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत कार्यरत आशा सेविकांना सहा हजार रुपये इतके दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेली आहेत . यामुळे ठाणे पालिका प्रशासनाची यंदाची दिवाळी चांगली आनंदात साजरी होणार हे निश्चित . सदर दिवाळी बोनस मधील वाढीकरिता पालिका प्रशासन कर्मचारी युनियनच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले आहेत .
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025