@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Demand to retain contractual/daily wage employees in service or allow euthanasia ] : समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत कायम करावे अन्यथा इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी करणारे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे .
मुंबई येथील आझाद मैदानावर ह्या कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन सुरु केले आहेत . तसेच या दरम्यान सदर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत आहेत . यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातुन सर्वाधिक 110 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे .
सदर कर्मचारी हे सन 2002 पासुन समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असून , त्यांच्या विविध प्रलंबित मागणी करीता दिनांक 04 मार्च 2025 पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे .
सदर अभियान अंतर्गत अपंग समावेशति शिक्षण विभाग मधील कर्मचारी यापुर्वीच शासन सेवेत कायम झाले आहेत .याच धर्तीवर सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या कायम करण्याची मागणी केली जात आहे .
यांमध्ये विषयतज्ञ , डाटा एन्ट्री ऑपरेटर , कनिष्ठ अभियंता , जिल्हा समन्वयक , को-ऑर्डिनेटर इ. पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . सदर विभागांमध्ये 20 वर्षापेक्षाही अधिक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .
यामधील 50 टक्के कर्मचाऱ्यांना शासनांकडून कायम करण्यात आले आहेत . आता सदर कर्मचाऱ्यांकडून शासनांकडे शासन सेवेत कायम करण्याची अन्यथा इच्छामरणाची मागणी करण्यात आलेली आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025