@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness Allowance, House Rent Allowance and Redressal of Salary Shortages ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित असणारा महागाई भत्ता , घरभाडे भत्ता व वेतनत्रुटी निवारण बाबींवर लवकरच निर्णयाची शक्यता आहे .
वेतनत्रुटी निवारण : राज्य कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणे संदर्भात वेतनत्रुटी निवारण समिती गठीत करण्यात आलेली होती . सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनांकडे सादर करण्यात आलेला असून , सदर अहवालास राज्य शासनांकडून लवकरच मंजूरी देण्यात येणार आहे .
महागाई भत्ता : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के वाढीव डी.ए लागु करणेबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकुण डी.ए केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के दराने दि.01.07.2024 पासुन डी.ए फरकास मिळणार आहे .
घरभाडे भत्ता : सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा नियोजित आहे , यामुळे आता दिनांक 01.07.2024 पासुन डी.ए दर 50 टक्के पेक्षा अधिक होणार आहे , यामुळे घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करणेबाबत निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेत .
कर्मचाऱ्यांना सुचना : आपल्या सामुहिक काही मागण्या / प्रलंबित प्रकरणे असतील तर या लेखाच्या कमेंट सेक्शनमध्ये नमुद करावा .. सदर प्रलंबित प्रकरणे आपल्या संकेतस्थळावर पब्लिश करण्यात येईल . ( प्रकरण नमुद करताना सविस्तर नाव / प्रकरण व विभागाचे नाव नमुद करावेत . )
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !