@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra and other state new rajyapal niyukti ] : राष्ट्रपती कडून महाराष्ट्र राज्यपाल पदी नवीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तर राजस्थान राज्याच्या राज्यपाल पदी महाराष्ट्र राज्यातील हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर मा.रमेश बैस यांची दि.18.02.2023 रोजी नेमणूक करण्यात आलेली होती , सदर पदी आता नवीन नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडून शनिवारी देशातील काही राज्यांच्या राज्यपाल पदी नवीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी सी .पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे . देशात पुढील 03 महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार असल्याने सदर नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे .
सी.पी. राधाकृष्णन हे भाजपाचे सक्रिय सदस्य असून, त्यांनी तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिले आहेत . तर बरेच वर्ष तामिळनाडू राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहेत , सन 2014 आणि 2019 निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते .
त्यांना दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी झारखंड राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती देण्यात आली होती यानंतर आता महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती राष्ट्रपती कडून करण्यात आली आहे . त्याचबरोबर सिक्कीम राज्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसादाचार्य यांची मणिपूर व आसाम राजाच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्याचबरोबर तेलंगणा राज्याचे राज्यपाल पदी विष्णू देव वर्मा हे असणार आहेत . तर सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदी प्रकाश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
तर पंजाब राज्याच्या राज्यपाल पदी गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तर छत्तीसगड या राज्याच्या राज्यपालपदी रमेन डेका यांची नियुक्ती करण्यात आली आहे . तर मेघालय राज्याच्या राज्यपाल पदी सी. एच. विजय शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्याचबरोबर पदुचरीच्या उपराज्यपाल पदी के. कैलाशनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र राज्यातील माजी विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर भाजपाचे जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे या नेत्याची राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे .
-
राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह…
-
महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for pensioners; Press release issued through Pensioners Association, Pune. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे निवृत्ती वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन , पुर्ण मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे .…
-
दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on 10 June 2025 ] : दिनांक 10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . 01.अनुसुचित जाती आयोगास वैधानिक दर्जा : राज्यातील महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती…