@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding fixing the minimum age for school admission in pre-primary and 1st grade ] : पुर्व प्राथमिक व इयत्ता पहिली शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करणेबाबत , प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 10 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय हे शासन निर्णय दिनांक 20.09.2020 नुसार प्ले ग्रुप , नर्सरी ,इयत्ता 1 ली पुर्वीचा तिसरा वर्ग किमान वय हे 3+ व याबाबत मानिव दिनांक डिसेंबर व इयत्ता पहिलीसाठी ..
6+ वयाबाबत मानीव दिनांक 31 डिसेंबर ही निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . परंतु माहिती अधिकार नागरी समूह या संस्थेने दिनांक 03.02.2025 नुसार शासन निर्णयाचे पुणे जिल्ह्यातील शाळा पालन करत नसल्याचे तक्रार दाखल केल्या आहेत .
तरी सदर तक्रारींच्या अनुषंगाने तसेच वरील नमुद शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे प्रवेशासाठी बालकांचे किमान वय बाबत अंमलबजावणी करणे बाबत शाळांना सक्त ताकीद देण्यात यावी , शाळा शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील तर शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर परिपत्रक हे प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक , प्रशासन अधिकारी , शिक्षणाधिकारी , प्रशासन अधिकारी पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .

- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !
- राज्यातील सर्व शाळांचे नविन अभ्यासक्रमानुसार कामाचे दिवस , विषय निहाय तासिक व सुधारित वेळापत्रक जाहीर !
- शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत , शिक्षण उपसंचालक यांचे परिपत्रक निर्गमित दि.17.06.2025
- SGSP : भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती !