सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना जानेवारी 2025 चा महागाई भत्ता अदा करणेबाबत , आत्ताची मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big Update on Payment of Dearness Allowance to Government Employees / Pensioners for January 2025 ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारक यांना माहे जानेवारी 2025 चा महागाई भत्ता  अदा करणेबाबत , राज्यसभेत जावेद अली खान यांनी वित्तमंत्री यांना दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता , सदर प्रश्नाला अनुसरुन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले आहेत .

राज्यसभेचे खासदार श्री.जावेद अली खान यांच्याकडून विचारण्यात आले आहे कि , आठवा वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यापुर्वी 50 टक्के डी.ए / डी.आर हे केंद्र सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या मूळ वेतन / पेन्शन मध्ये विलीन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे कि नाही ? या वर उत्तर देताना केंद्रीय राज्य वित्तमंत्री यांनी उत्तर दिले कि , तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे नमुद करण्यात आले .

तर तसे असल्यास त्याचे तपशिल विचारण्यात आले असता , याबाबत कोणतीही बाब उद्भवत नसल्याचे नमुद करण्यात आले , तर नसल्याची त्याची कारणे विचारले असता , नमुद करण्यात आले कि , महागाई भ्त्ता ( डी.ए ) / महागाई भत्ता सवलत ( डीआर ) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना  / निवृत्तीवेतन धारकांना राहणीमानाचा खर्च समायोजित करण्यासाठी व त्यांच्या मुलभूत वेतन / पेन्शनला महागाई मुळे खऱ्या ..

मुल्या घट होण्यापासून वाचवण्यासाठी दिले जाते असे नमुद करण्यात आले आहेत , तसेच कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कामगार ब्युरोने केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी आखिल भारतीय ग्राहक निर्देशांक ( ACPI – IW ) च्या आधारावर डी.ए / डी.आर चा दर नियमितपणे दर 06 महिन्यांनी सुधारित केला जातो असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !

तसेच दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी लागु केल्यापासून डी.ए / डी.आर चे 15 हप्ते मंजूर करण्यात आले आहेत , असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment