दि.01 एप्रिलपासुन आयकर नियम , UPI व क्रेडीट कार्डचे नियमात मोठे बदल ; सरकारी कर्मचाऱ्यांना फायदेशिर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big changes in income tax rules, UPI and credit card rules from tomorrow, April 1st; Big benefit for employee.. ] : दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन देशात आयकर नियम तसेच क्रेडीट कार्ड व युपीआयच्या नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत .

युपीआय नियमात बदल : दिनांक 01.04.2025 पासुन युपीआय नियमामध्ये  महत्वपुर्ण बदल करण्यात आला आहे , या नियमास राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियन बँका तसेच पेमेंट सेवा प्रोवायडर्सला आज दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत डेटाबेस अपडेट करण्यास सांगण्यात आले आहेत .

या नियामानुसार , जे मोबाईल नंबर बंद झाले आहेत , असे मोबाईल नंबर हे युपीआयच्या सर्व रेकॉर्ड मधून हटविण्यात येणार आहेत . यामुळे आपले मोबाईल क्रमांक जर बंद असतील तर चालु करुन घेणे आवश्यक असेल .

आयकर नियमात बदल : उद्या दिनांक 01 एप्रिल पासुन नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे , तर अर्थमत्र्यांने सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष 2025-26 पासुन नवे आयकर नियम लागु होणार आहेत . यांमध्ये 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहेत .

हे पण वाचा : गट क ( Class C ) पदाच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

नवे कर रचना मध्ये 4 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्नावर 0 टक्के आयकर लागणार आहे , तर 4 ते 8 लाख रुपये उत्पन्नावर 10 टक्के तर 8 ते 12 लाख रुपये उत्पन्नावर 15 टक्के तर 16 ते 20 लाख रुपये उत्पन्नावर 20 टक्के तर 20 ते 24 लाख रुपये उत्पन्नावर 25 टक्के तर 24 लाख रुपये उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाणार आहे .

कर्मचाऱ्यांना 01 एप्रिल पासुन नविन पेन्शन प्रणाली : केंद्र सरकारने सुरु केलेली युपीएस पेन्शन प्रणाली दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन लागु करण्यात येत आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे .

क्रेडिट कार्ड नियमावलीत बदल : एअर इंडिया एसबीआय – प्लॅटिनम क्रेडिट कार्ड , स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड , IDFC फर्स्ट बँक , ॲक्सिस बँक यांच्या क्रेडीट कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे .

Leave a Comment