@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ smart investment for reachness ] : आयुष्यामध्ये प्रत्येकाला श्रीमंत व्हावेसे वाटते , परंतु अनेक जण पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक न केल्याने , विशिष्ट वयामध्ये आपल्या आर्थिक गरजा योग्य पद्धतीने भागू शकत नाहीत . परंतु स्मार्ट पद्धतीने पैशांची योग्यरीत्या गुंतवणूक केल्यास , कमी वयात श्रीमंत होण्याचा मार्ग सुकर होतो . याकरिता पैशांची गुंतवणूक कशा पद्धतीने करावी या संदर्भातील फार्मूला पुढील प्रमाणे जाणून घेऊयात..
नियमित पैशाची बचत : आपण आपल्या कमाईचा काही विशिष्ट भाग यामध्ये कमाईच्या सुमारे 70% बचत करावी जेणेकरून कमी वयात श्रीमंत होण्याचा मार्ग लवकर गाठता येईल , तर उर्वरित 20 टक्के रक्कम आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वापरण्यात यावे . तर इतर दहा टक्के रक्कम आपल्या वैयक्तिक विकासासाठी आवश्यक बाबीवर खर्च करण्यात यावा . ज्यामध्ये नवीन स्किल आत्मसात करणे , छंद जोपासणे अशा प्रकारच्या बाबीवर खर्च करण्यात यावा .
पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक : आपण जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर , शेअरची योग्य प्रकारे अनालिसिस करूनच सदर शेअर मध्ये गुंतवणूक करावी , त्याचबरोबर आपली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम कमी असेल तर , शासनाच्या अधिक व्याज देणाऱ्या गुंतवणूक योजनेमध्ये पैशाची गुंतवणूक करावी . यामध्ये अटल पेन्शन योजना , पोस्टाच्या विविध बचत योजना अशा गुंतवणुक योजना मध्ये गुंतवणूक करण्यात यावी , ज्या मधून आपल्याला चांगला आर्थिक फायदा होईल .
कमीत कमी खर्च करावे / अनावश्यक खर्च टाळावे : आपणास जर कमी वयामध्ये श्रीमंत व्हायचे असल्यास , कमीत कमी खर्च करावे , अथवा अनावश्यक खर्च नेहमीच टाळावे जेणेकरून आपली बचत दीर्घकाळ टिकून राहील .
सोन्यातील गुंतवणूक : आपण जर सोन्याच्या किमतीचा विचार केला असता , सोन्याच्या किमतीमध्ये दरवर्षी मोठी वाढ दिसून येते , मागील वर्षी सोन्याची सर्वसाधारण किंमत 5,100/- प्रती ग्रॅम इतकी होती तर यावर्षी सोन्याची सर्वसाधारण किंमत 6100/- इतकी आहे . म्हणजेच सोन्याच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने , सोन्यातील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025