@marthiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval for recruitment of Art/Sports and Computer Teachers under Tribal Development Department ] : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत एकुण 1497 कला , क्रिडा व संगणक शिक्षकांच्या पदभरतीस दिनांक 18.02.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 16.11.2022 रोजीच्या सुधारित आकृतीबंधानुसार प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत कला , क्रिडा व संगणक प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण 1497 पदे हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास व त्याकरीता होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे .
आदिवासी विकास विभागांमध्ये एकुण 499 आश्रमशाळा कार्यरत आहेत , यानुसार 499 कला शिक्षक , 499 क्रिडा शिक्षक व 499 संगणक शिक्षक असे एकुण 1497 शिक्षकांची बाह्य स्त्रोताद्वारे पदभरतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे .
याकरीता स्वतंत्र निविदा पोर्टल तयार करण्यात आले असून , 81,08,75,000/- रुपये रक्कम इतक्या रकमेच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे . याकरीता GeM Portal वर निविदा मागविण्यात येत आहेत .
सदर निर्णयानुसार , ऑनलाईन पद्धतीने निविदा मागविण्यात येत आहे , त्यानंतर सदर 1497 जागेवर सदर बाह्यस्त्रोत कंपनीकडून पदभरती करण्यात येईल . या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !