राज्यातील महाविद्यालयात  आपले सरकार सेवा केंद्र सरु करण्यास मंजुरी ; GR दि.20.08.2024

Spread the love

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ aple seva kendra in college shasan nirnay ] : राज्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरु करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग ( माहिती तंत्रज्ञान ) विभाग मार्फत दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र सीएससी 2.0 योजना अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत सुचना निर्गमित करण्यात आले आहेत , सदर सरकार सेवा केंद्राचे स्थापन प्रशसकीय यंत्रणा व सनियंत्रण हे जिल्हाधिकारी यांच्या कडे सोपविण्यात आलेले आहेत . राज्यातील महाविद्यालयाती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील 10 तालुक्यामधील 15 महाविद्यालयांत प्रायोगिक तत्वावर सदर आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर निर्णयानुसार राज्यांमध्ये लोकप्रिय झाला असल्याने अशा प्रकारचे आपले सरकार सेवा केंद्र राज्यातील इतर ठिकाणांवरुनही मागणी येत असल्याने , राज्यातील मागणी येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये आपले सरकार सेवा सुरु करण्यास मान्यता देण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

सदर शासन निर्णयानुसार राज्यातील ज्या- ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे  , अशा महाविद्यालयांना दिनांक 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अनुसरुन आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यास मंजूरी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .

अशा महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र मंजूरी देत असताना , सदर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या सल्लाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर सदर प्रकारची कार्यवाही करताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या. ( महाआयटी ) मुंबई यांच्याशी तांत्रिक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ..

Leave a Comment