@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ After HSC CAREER Course / Education ] : इयत्ता 12 वी नंतर करीयरच्या दृष्टीने कोणत्या अभ्यासक्रमाला जावेत , याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये नेहमी संभ्रम निर्माण होत असतो . कोणते अभ्यासक्रम केल्यानंतर करीयरच्या संधी अधिक उपलब्ध आहेत , त्या बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .
12 वी विज्ञान ( Science ) नंतर कोणते अभ्यासक्रम करावेत ? : 12 वी विज्ञान नंतर करीअरसाठी सर्वाधिक पर्याय असणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत , जे कि पदवी व डिप्लोमा सारखे अभ्यासक्रम आहेत . यांमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी ( B.PHARM / D.PHARM ) , B.Tech in Agriculture , B.sc Bio-Technology , b.sc Agriculture ,बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी , बॅचलर ऑफ यूनानी मेडिसीन अँड सर्जरी , पॅरामेडिकल , नर्सिंग ( सर्वाधिक स्कोप ) , लॅबोरोटरी तंत्रज्ञ , डेंटल सर्जरी , एनडीए , इंजिनिअरिंग ..या शिवाय बीसीएस , बीसीए , बीएससी , बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स अशा प्रकारचे करीयर ओरिएंडेट अभ्यासक्रमास प्रवेश घेवू शकता .
12 वी वाणिज्य नंतर कोणते अभ्यासक्रम करावेत ? : इयत्ता 12 वी वाणिज्य नंतर बहुदा बी.कॉम केल्यानंतर कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते , तर खाजगी तसेच सरकारी बँकामध्ये वाणिज्य शाखेतून पदवी उत्तीर्ण उमेदवारांना प्रथम स्थान दिले जाते . तसेच वाणिज्य शाखेतुन बी.बी.ए , बी.सी.ए , एम. कॉम , तसेच सी.ए . , सी.एस अशा प्रकार अभ्यासक्रम पुर्ण करता येईल . वाणिज्य शाखेतुन एम.कॉम पर्यंत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर टॅली व टायपिंग झाल्याच्या नंतर नामांकित कंपनीमध्ये अकौंटंड / लिपिक या सारखे जॉब सहज मिळतात .
12 वी कला नंतर काय करावेत ? : कला शाखेनंतर विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात अभ्यासक्रम उपलब्ध आहेत . 12 वी कला शाखेनंतर आपणांस बी.ए , एल.एल.बी. , बी.एस.डब्ल्यु , फॅशन डिझाइनिंग कोर्सेस अशा प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावेत लागतील . कला शाखेतील विद्यार्थी खास करुन स्पर्धा परीक्षेची तयार करण्याकडे अधिक जोर देतात . यामुळे पदवी सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी .
-
शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular and form to provide information to teachers for registration for senior and selected category in-service training ] : वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मा.आयुक्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य नाशिक…
-
भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Despite huge opposition from BJP, 4% reservation for Muslims finally ] : भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे . कर्नाटक विधानसभेत या संदर्भात निर्णय घेतला असून , या राज्यात आता मुस्लिम समुदायाला 4 टक्के आरक्षण लागु करण्यात…
-
दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weather forecast till March 25: Unseasonal rains will fall in these parts of the state ] : दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या काळातील सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . राज्यांमध्ये सध्या वातावरणात अचानक बदल होताना दिसून…