@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 7th pay commission and medical bill shasan paripatrak ] : वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके व प्रलंबित सातवा वेतन आयोगाचे 4 था , पाचवा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके तसेच सेवानिवृत्त शिक्षक व केंद्र प्रमुख ( वसुली असलेले केंद्रप्रमुख वगळुन ) यांच्या 7 वा वेतन आयोगांमध्ये प्रलंबित हप्ते इ. अदा करणेबाबत निधी प्राप्त झालेला आहे . वैद्यकीय देयके ( Medical bill ) व प्रलंबित 7 वा वेतन आयोग ( 7th pay commission Installment ) हप्ते हे शालार्थ प्रणालीमधून अदा करणेबाबत , वरिष्ठ कार्यालयांकडून सुचना प्राप्त झाले असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
त्याकरीता सदरचे वैद्यकीय देयके व प्रलंबित 7 वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेकामी शालार्थ प्रणालींमध्ये टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . तसेच सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके व प्रलंबित 7 वा वेतन आयोग हप्ते यादीप्रमाणे तालुका निहाय अदा करण्याकरीता रक्कम निश्चित करुन सदरची यादी …
व विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने या कार्यालयास ( सॉफ्टकॉपी व हार्डकॉपीसह ) सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरच्या यादीप्रमाणे , शालार्थ प्रणालीमध्ये वैद्यकीय देयके तयार करुन आठ दिवसांमध्ये देयके विलंबाने सादर केल्यास व नियमान्वये पात्र असणाऱ्या एकही देयके प्रलंबित राहील्यास , त्यास सर्वस्वी कार्यालय प्रमुखाची जबाबदारी राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !